माझ्या मॅनेजरला वाटलं मी वेडी झाले आहे, वाचा असं का म्हणाली बिपाशा बासू

बिपाशा बासूने जिस्म चित्रपट साईन करत आपण हिंदी चित्रपटातील पारंपारिक अभिनेत्रीच्या छबीला छेद दिल्याचं बिपाशाने सांगितलं आहे. “जिस्म हा तो काळ होता जेव्हा मी यशाच्या शिखरावर होते आणि सर्वजण मला म्हणायचे, ‘तू अ‍ॅडल्ट कंटेंट असणारा चित्रपट करू शकत नाहीस. तू त्या सामान्य हिंदी नायिकेसारखी आहेस जिने लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे’ आणि मी म्हणाले, मला ही कथा खूप आवडली आहे. मी तो चित्रपट करण्याचं ठरवलं होतं. सर्वांनी मला ते करण्यापासून रोखलं होतं. माझ्या मॅनेजरला तर मी वेडी झाली असं वाटत होतं,” असं ती म्हणाली.

या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत महिलांच्या भूमिकांबद्दलच्या धारणा बदलल्या, ज्यामध्ये ग्रे शेड किंवा नकारात्मक भूमिकांचा समावेश होता असा दावा बिपाशाने केला आहे. तसंच सौंदर्य आणि फॅशन ट्रेंडवर त्याचा परिणाम झाल्याचंही सांगितलं. “मला त्याचा फायदा झाला आणि नंतर गोष्टी बदलल्या. महिला केसांची स्टाईल बदलू लागल्या. त्यांनी ब्राँझ लूक निवडला. अशी कोणतीही रूढीवादी (विचारसरणी) नव्हती की स्त्री नकारात्मक भूमिका साकारू शकत नाही. त्यानंतर सर्व काही बदलले. म्हणून तो माझ्यासाठी विचारांना छेद देणारा चित्रपट ठरला. तो एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे,” असं ती म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here