बिर्याणी विक्रेत्याचा विद्यार्थिनीवर बलात्कार, कोर्टाने सुनावली कठोर शिक्षा

गेल्या डिसेंबरमध्ये चेन्नईच्या आण्णा विद्यापीठात 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली होती.

बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावताना न्यायाधिशांनी महत्वाचे विधान केले. आरोपीला किमान ३० वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्याच्यावर कोणतीही दया दाखवू नये, असे न्यायाधीश एम. राजलक्ष्मी म्हणाले. न्यायाधीश राजलक्ष्मी यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर २ जूनपर्यंत शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. ज्यामध्ये आज न्यायालयाचा निर्णय समोर आला आहे. याप्रकरणात शिक्षा सुनावताना आरोपी ज्ञानशेखरनला आजीवन कारावासाची शिक्षा आणि ९० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

स्थानिक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला बिर्याणी विकणारा आणि गुन्हेगारी कारवायांचा इतिहास असलेला गुन्हेगार ज्ञानशेखरन याला अटक केली. ही घटना २३ डिसेंबर २०२४ रोजी घडली. पीडित मुलगी इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी होती आणि तिच्या पुरुष मित्रासह कॉलेज कॅम्पसमध्ये होती. ज्ञानशेखरनने त्यांना एक बनावट व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केले. व्हिडीओ लोकांना शेअर केला तर तुला कॉलेजमधून काढून टाकले जाईल अशी धमकी दिली होती.त्यानंतर त्याने मुलाला जबरदस्तीने तेथून निघून जाण्यास भाग पाडले आणि मुलीला कॅम्पसच्या एका निर्जन भागात घेऊन गेला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून मुलाची चौकशी सुरू आहे असे भासवून त्याने पीडितेला आणखी धमकावले. जेव्हा तिने त्याच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला तेव्हा ज्ञानशेखरनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि व्हिडिओ देखील बनवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here