बिष्णोई गँग मार्फत माझा काटा काढायचा प्रयत्न

“बिष्णोई गँगमार्फत माझा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे”, असा घणघणाती आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते म्हणाले, “खोक्या भोसले आणि माझं नाव जोडून माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत, माझ्याविरोधात आंदोलन चालू आहे, राजस्थानमधील बिष्णोई समाजाच्या लोकांना मुंबईत आणून माझ्याविरोधात वक्तव्ये करायला लावली जात आहेत. हे सगळं बिष्णोई टोळीपर्यंत पोहचवून माझा काटा काढण्याचं षडयंत्र रचण्यात आलं आहे.”

सुरेश धस म्हणाले, “खोक्या भोसले प्रकरण समोर आल्यावर मी स्पष्ट सांगितलं होतं की त्याच्यावर कारवाई करा. मी त्याला लपवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पोलिसांना देखील फोन केला नाही. मात्र, काही लोक परळीवरून माझ्या मतदारसंघात पाठवण्यात आले. खोक्याच्या आडून माझ्यावर टीका केली. मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here