भीषण अपघातात भाजप नेत्याचा मृत्यू

तुळजापूर ते औसा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भाजप नेते तथा माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आर टी देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती होते. आर टी देशमुख यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार उलटली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. रुग्णालयात पोहचण्याआधीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे आमदार होते. माजी आमदार आर टी देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती होते.भाजपच्या संघटनात्मक मांडणीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here