गुजरात येथील बनासकांठा या ठिकाणी असलेल्या फटाका फॅक्ट्रीत स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.
१ एप्रिलच्या दिवशी बनासकांठा या ठिकाणी असलेल्या फटाका फॅक्ट्रीला आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाले. या आगीत अनेक कर्मचारी अडकून पडल्याची भीती आहे. आज सकाळच्या सुमाराला ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी दिली आहे. तसंच या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं.