विमानांना बॉम्बने उडवून देण्याचे धमकीसत्र सुरूच! इंडिगो विमानाला पुन्हा एकदा धमकी

गेल्या काही दिवसांपासून विमानाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशीच पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी इंडिगो विमानाला मिळाली आहे. जयपूरवरून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आहे.

बॉम्बने फ्लाईट उडवून देण्याची धमकी मिळताच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी जयपूरवरून मुंबईला आलेली फ्लाईटचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. फ्लाईटचे लँडिंग नेहमीप्रमाणे करण्यात आले होते. मात्र विमान लँडिंग झाल्यावर व सर्व प्रवासी उतरल्यावर विमानाच्या वॉशरूममध्ये यासंदर्भात चिट्ठी मिळाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान विमानतळ पोलीस, सीआयएसएफ सुरक्षा दल ही चिट्ठी विमानात कोणी ठेवली आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास करत आहे. दरम्यान या प्रकारानंतर प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे इंडिगोने स्पष्ट केले आहे. सध्या फ्लाईटची कसून तपासणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here