सोशल मीडियामुळे कधी कोणत्या गोष्टीची चर्चा होईल आणि चुकीची माहिती पसरेल हे सांगता येत नाही. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यावर त्यांच्याविषयी लोकांनी वेगवेगळे तर्क लावले. कृष्णराज महाडिक आणि रिंकू लग्न करणार, असा अंदाज काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला. पण आता या फोटोविषयी कृष्णराज महाडिकने प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर लोकांचा गैरसमज दूर झाला आहे. कृष्णराज महाडिक याने स्वतः खुलासा केला..
कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर हा फोटो काढण्यात आला होता. कृष्णराजने सांगितलं की, “माझी सगळ्यांना विनंती आहे, माझ्या फोटोमुळे अजिबात गैरसमज करुन घेऊ नका. त्या माझ्या चांगल्या मैत्रिण आहेत. त्या कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी आमची भेट झाली. आम्ही एकत्र महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तिथे आम्ही फोटो काढला आणि माझ्या ऑफिस टीमकडून हा फोटो पोस्ट करण्यात आला. त्याच्यामुळे भरपूर अफवा पसरल्या आहेत. पण तसं काहीही नाही.” माझ्या आणि त्यांच्या कुटुंबियांनीही याविषयी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. नेमकं काय चालू आहे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. पण तसं काही नाही. गैरसमज करुन घेऊ नका. आम्ही ठरवून भेटलो आणि मंदिरात दर्शनासाठी एकत्र गेलो. परंतु त्या फोटोवरुन वेगळा अर्थ काढला जातोय, म्हणून मला बोलावं लागतंय.”
Home ब्रेकिंग न्यूज रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिकच्या फोटोची चर्चा! अखेर कृष्णराज महाडिकने केला खुलासा