पुण्यात मोठी दुर्घटना! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

पुण्यातील इंद्रायणी नदीजवळील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ ते ३० पर्यटक वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या कुंडमळ्याच्या या पुलावर विकेंडनिमित्त पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र हा पूल जीर्ण झाला होता.

यावेळी पूलावर पर्यटकांची गर्दी वाढल्याने पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. यात काही पर्यटक जखमी झाल्याचं समजतंय. घटनास्थळी १८ ते २० रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. तसंच NDRFच पथकही पोहोचलं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. ४० पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here