नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्धापूर तालुक्यातील एका गावात तीन तरुणी महाविद्यालयाच्या (College) तृतीय वर्षात शिकतात. 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर दुपारी ह्या तीन तरुणी आप-आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरुन तामसा रोड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, अल्पवयीन भाई आपल्या दोन मित्रांसोबत हॉटेल गारवा लॉजवर पोहचल्यानंतर मोठा राडा झाला. याप्रकरणी, जिवे मारण्याचा प्रयत्न अन् अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) अधिक तपास सुरू आहे.
भावाने बहिणीला आणि तरुणाला एका खोलीत रंगेहाथ पकडल्यानंतर घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरुन उडी मारून पळ काढला, यात तिचा एक हाथ मोडला. दरम्यान तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांनी तरुणाला लॉजमधून बाहेर आणले. त्यानंतर, भोकर फाट्याजवळ आणून त्याला मारहाण करुन पोटात खंजर भोसकला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.