अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग आठव्यांदा अर्थसंकल्प मांडला. सर्वसामान्य, नोकरदार, महिला, व्यापारी आणि उद्योजक सगळ्यांचेच या बजेटकडे डोळे लागले होते.
अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागल्या आहेत. त्या बद्दल जाणून घेऊया.

काय स्वस्त होणार?
LED स्वस्त
भारतात बनवलेले कपडे
मोबाइल फोन बॅटरी
82 सामानांवरुन सेस हटवला
लेदर जॅकेट
बूट
बेल्ट
पर्स
ईवी वाहन
LCD
LED टीव्ही
हँडलूम कपड़े
36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर झाली आहे. कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आगहे. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे.
काय महागलं?
फ्लॅट पॅनेल डिस्प्ले महाग होणार आहेत
इम्पोर्टेड कपडे
त्याचबरोबर यंदाच्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स संबंधात मोठी घोषणा करण्यात आली आहे. ज्यांचे उत्पन्न 12 लाख किंवा 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना आयकर भरावा लागणार नाही.