Budget: अर्थ संकल्पातील महत्त्वाच्या घोषणा! शेतकरी, तरुणांसाठी कोणत्या घोषणा?

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. संपूर्ण देशाचं लक्ष आजच्या अर्थ संकल्पाकडे लागलं होतं.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 8 व्यांदा हे बजेट मांडलं. यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे आणि आरोग्यबद्दल महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महत्त्वाच म्हणजे निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबाबत कोणतीही घोषणा केली नाही. पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक सादर केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ नगरिकांना टॅक्समध्ये दिसाला देण्यात आलाय.
दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मधील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत पाहुयात

  1. महिला आणि शेतकरी या घटकांकडे अर्थसंकल्पात विशेष लक्ष
  2. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य
  3. ग्रामीण महिला आणि तरुणांकडे विशेष लक्ष
  4. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापना, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारसाठी बोर्ड
  5. लघुउद्योगाद्वारे ७.५ कोटी लोकांना रोजगार देणार
  6. ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार
  7. AI शिक्षणासाठी ५०० कोटींची तरतूद
  8. २०२५ मध्ये आणखी ४० हजार नागरिकांना घरे देणार
  9. न्यूक्लिअर एनर्जी मिशनसाठी २०,०० कोटींची तरतूद
  10. मेरिटाईम डेव्हलपमेंड फंडसाठी २५,००० कोटींची तरतूद
  11. चामड्याची पादत्राणं बनवण्यांसाठी विशेष योजना
  12. भारताला खेळण्यांचा क्षेत्रात ग्लोबल हब बनवणार
  13. स्टार्ट अप्ससासाठी 10 कोटीवरुन 20 कोटींची क्रेडीट लिमिट
  14. भारतीय भाषांमधील पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार
  15. कर्करोगाचे सर्व औषधं पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार
  16. ५० नवी पर्यटन स्थळं विकसित करणार
  17. विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता
  18. सूक्ष्म उद्योगांसाठी MSME क्रेडिट गॅरंटी कव्हर 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाणार आहे.
  19. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांसाठी विशेष योजना
  20. शहरी भागातल्या विकासकामांसाठी स्वतंत्र निधी, शहरांच्या विकासासाठी १० हजार कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here