केकमुळे होऊ शकतो कॅन्सर!

आजकाल वाढदिवस असो, लग्नाचं सेलिब्रेशन असो किंवा कोणतीही सक्सेस पार्टी, कोणतंही सेलिब्रेशन या अशा रंगीबेरंगी केकशिवाय पूर्णच होत नाही. बच्चे कंपनीपासून अगदी थोरामोठ्यांनाही या केकचं जणू व्यसनच लागलंय. मात्र हाच रंगीबेरंगी केक कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतो. कर्नाटक फूड सेफ्टी डिपार्टमेंटने केलेल्या एका सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती उजेडात आलीय. या सेफ्टी टेस्टमध्ये 12 प्रकारच्या केकमुळे कॅन्सरला निमंत्रण मिळत असल्याचं आढळलंय.

FSSAI ने केकच्या 235 नमून्यांचं परिक्षण केलं. यापैकी 12 केकमध्ये धोकादायक आर्टिफिशियल रंग होते जे कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतात. धक्कादायक म्हणजे या कॅन्सरकारक केकमध्ये तुमच्या ब्लॅक फॉरेस्ट, रेड व्हेलवेटचाही समावेश आहे. या केकमधीक धोकादायक रसायनं तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडवू शकतात. अनेक कृत्रीम खाद्यरंगांमध्ये कॅन्सरकारक विषारी पदार्थ असतात. सनसेट येलोसारख्या इतरही काही कृत्रीम रंगामुळे अस्थमा रुग्णांना त्रास होतो. घातक रंगांच्या सेवनानं सूज, श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. अस्थमा रुग्णांमध्ये या रंगांमुळे अॅलर्जीच्या प्रमाणात 52% वाढ होते. या अशा कॅन्सरकारक रंग असलेल्या केकमुळे तुमच्या आमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

सिंथेटीक रंगामुळे जुलाब, मळमळ, उलटी होऊ शकते. डोळ्यांचे विकार, यकृतांचे विकार होण्याची भीती असते. केकमधील घातक रंगामुळे कॅन्सरचा धोका अधिक असतो. कर्नाटक फूड सेफ्टी डिपार्टमेंटनं या रंगीबेरंगी केकचा अभ्यास करुन हा दावा केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here