अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम? मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

xr:d:DAFFuQ1RO2w:174,j:30841316958,t:22071516

अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांना बोलावून गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

बैठकीस वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, राज्यकर, वस्तू व सेवा कर आयुक्त आशिष शर्मा, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, ‘मित्रा’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल तसेच, ‘मित्रा’चे अर्थतज्ज्ञ संजीव सक्सेना, मुंबई स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे प्राध्यापक सत्यनारायण कोठे आणि अर्थतज्ज्ञ ऋषी शाह यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

बैठकीत जीडीपी, रोजगार, वाणिज्य आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. अमेरिकेच्या टैरिफ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर संभाव्य परिणाम, तसेच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here