सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. १३ मे रोजी सीबीएसईने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. ८८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. तुम्ही सीबीएसई दहावी आणि बारावीचे निकाल cbseresults.nic.in येथे जाऊन डाउनलोड करू शकता.
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या उत्तीर्णतेचा टक्का पाहता मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का हा ९१.६४% आहे, तर मुलांचा ८५.७०% आहे आणि ट्रान्सजेंडरचा उत्तीर्णतेचा टक्का १००% आहे. यंदाच्या वर्षीचा (२०२५) निकाल २०२४ पेक्षा चांगला लागला आहे. मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का मुलांपेक्षा ५.९४% जास्त आहे.