‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमानं संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात स्थान निर्माण केलं. तब्बल दहा वर्षं, म्हणजे 2014 ते 2024 या काळात हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र, 2024 मध्ये या कार्यक्रमात अर्थात तेच ते विनोद आणि त्यात काहीच वेगळेपणा नाही म्हणून हा शो बंद करण्याचा निर्णय वाहिनीनं घेतला. वाहिनीच्या या निर्णयानं अनेक प्रेक्षक नाराज झाले. पण आता हाच शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता प्रेक्षकांबरोबरचं नातं आणखी दृढ करण्यासाठी ‘झी मराठी’ एका नवीन रूपात, नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहेया नव्या प्रवासात ‘देवमाणूस’ आणि लवकरच सुरु होणारी ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर, ‘चला हवा येऊ द्या’सारखा बहुप्रतीक्षित कार्यक्रमही नव्याने परतत असल्याने हास्यप्रेमी प्रेक्षकांसाठी हे वर्ष नक्कीच खास ठरणार आहे.’ पण आता या कार्यक्रमाचं शूटिंग कधी सुरु होणार किंवा हा कार्यक्रम कधी पाहायला मिळणार याविषयी काहीही माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here