चंद्रराव तावरे यांचा अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले…पोलिस पाटीलदेखील…

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत आता रंग चढताना पाहिला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः मीच या कारखान्याचा चेअरमन असल्याची घोषणा त्यांनी भर सभेत केलीय. त्यानंतर विरोधकांकडूनही त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तुमच्या घरात 3 खासदार, 2 आमदार आहेत तरीदेखील तुम्हाला आता कारखान्याचे चेअरमनपद पाहिजे म्हणत घणाघात केलाय. खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस माझे वय दिसत नाही मात्र कारखान्याची निवडणूक लागली की माझ्या 85 वर्षाच्या वयाचा मुद्दा काढतात. उद्या त्यांच्या काटेवाडी गावचे पोलीस पाटील देखील अजित पवार होतील असा निशाणा चंद्रराव तावरे यांनी साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here