आमचा काही संबंध नाही कारवाई झालीच पाहिजे, प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी बावनकुळेंच स्पष्टीकरण

समाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये रविवारी सायंकाळी हल्ला करण्यात आला. संभाजी ब्रिगेड या संस्थेच्या नावात संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याने हा हल्ला करण्यात आल्याचा दावा केला आहे. भारतीय जनता पार्टीचे सक्रीय पदाधिकारी दिपक काटेंच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. काटेंचा संबंध माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबत असल्याचा दावा केला जात आहे. हल्लेखोर बावनकुळेंचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. बावनकुळेंसोबतचा काटेंचा फोटो ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला आहे. या आरोपाला स्वत: बावनकुळेंनी उत्तर दिलं आहे.

या आरोपांसंदर्भात भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया नोंदवातना या हल्ल्याचा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. “प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही, अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही,” असं बावनकुळे म्हणालेत. “प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही, भाजपचा कार्यकर्ता आहे पण कारवाई झाली पाहिजे,” असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here