सीएसके कडून १७ वर्षाच्या खेळाडूला मिळू शकते संधी!

आयपीएल 2025 मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (RR VS LSG) सामन्यात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याने संधीचं सोनं केलं आणि 34 धावा केल्या. यासह तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. आता यानंतर वैभव सूर्यवंशीचा पार्टनर आयुष म्हात्रे याच सुद्धा आयपीएलमध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मुंबईचा राहणारा 17 वर्षांचा आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) हा फलंदाज 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात पदार्पण करू शकतो. सीएसकेकडून त्याला संधी दिली जाऊ शकते.

चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुखापतग्रस्त झाल्याने तो आयपीएल 2025 च्या संपूर्ण सीजनमधून बाहेर पडला. तेव्हा त्याची रिप्लेसमेंट म्हणून मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आयुष म्हात्रे याला सिएसकेने करार बद्ध केलं. सध्या चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये 7 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकून प्रथम स्थानावर आहे. त्यांचा आठवा सामना ते रविवार 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.

जर सीएसकेला युवकांना संधी द्यायची असेल तर आयुष म्हात्रे आणि डेवाल्ड ब्रेविस हे यात सर्वात पुढे असतील. 17 वर्षांचा आयुष म्हात्रे हा भारताच्या अंडर 19 संघाकडून खेळतोय. मुंबईसाठी सुद्धा त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं. दक्षिण आफ्रिकेचा ‘बेबी एबी’ म्ह्णून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस याला सुद्धा चेन्नईकडून संधी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here