लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अनेक मराठी कलाकारही या चित्रपटात आहेत. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्याचं शौर्य, बलिदान हे सगळं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. विकी कौशलच्या करिअरमधला ‘छावा’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटामुळे विकीचे फॅन्स वाढले आहेत. बॉक्स ऑफिसवर सध्या हा चित्रपट धुमाकूळ घालतोय. काही ठिकाणी पहाटे 4:30, 5 तर मध्यरात्री 1:30 वाजता सुद्धा शो लावण्यात आले आहेत. 12 दिवसात या चित्रपटाने कशी कमाई केली आहे पाहुयात

छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी 33.1 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 39.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 48.5 कोटी रुपये कमावले., चौथ्या दिवशी 24 कोटी आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 24.50 कोटी रुपयांची कमाई केली. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 32 कोटींचा गल्ला जमवला. सातव्या दिवशीची कमाई 21.5 कोटी, आठव्या दिवशीची कमाई 23 कोटी रुपये, तर नवव्या दिवशी 45 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने दहाव्या दिवशी 40 कोटी, अकराव्या दिवशी 19.10 कोटी रुपये कमावले. बाराव्या दिवशी 17 कोटी कमावले. या चित्रपटाचं बारा दिवसांमधलं बॉक्स ऑफिस कलेक्शन 365.25 कोटी रुपये इतकं झालं आहे.
छावा’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली 2’ ‘पुष्पा 2’ या चित्रपटांचे काही रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ‘छावा’चं वर्ल्डवाईड कलेक्शन 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या चित्रपटाचं बजेट 130 कोटी रुपये इतकं आहे.