चीन सागरी ब्लॅक आउटसाठी सज्ज, केली नवी यंत्रणा तयार

सागरी किनारपट्टी लाभलेल्या प्रत्येक देशाची सागरी सीमा निर्धारित असली तरीही चीन मात्र सध्या जगभरातील देशांसाठी अथांग समुद्रामध्ये खोलवर एक धोक्याचं पाऊल उचलताना दिसत आहे. लक्षवेधी वृत्तानुसार चीनकडून एक असं उपकरण तयार करण्यात आलं आहे, ज्यामुळं समुद्राच्या प्रचंड खोलवरील अंतरावर असणाख्या ‘अंडर सी केबल’सुद्धा कापता येतील.

‘चायना शिप सायंटिफिक रिसर्च सेंटर अँड लॅबोरेटरी ऑफ डीप सी मॅन्ड व्हीकल्स’नं मिळून हे उपकरण तयार केलं असून, जागतिक स्तरावर पहिल्यांदाच कोणा एका देशानं हे उपकरण तयार करण्यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. चीनचं हे उपकरण जगभरातील विविध संचार आणि सैन्य अभियानांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या Undersea Cables वर निशाणा साधू शकतं.

लक्षात घेण्याजोगी बाब अशी, की या त्याच केबल आहेत ज्यांच्या माध्यमातून जगातील ९५ टक्के डेटा एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी एका क्षणात पाठवता येतो. महाद्वीपांना जोडण्याशिवाय या केबलच्या माध्यमातून Money Market, संरक्षण यंत्रणा आणि दैनंदिन डिजिटल सेवा सुरळीत ठेवण्याचं काम होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here