जगात सध्या युद्धाचे वातावरण असताना स्वतःला सशक्त करण्यासाठी चीनने एक पाऊल पुढे टाकलं आहे. चिनी वैज्ञानिकांनी एक लष्करी ड्रोन तयार केलं आहे. या ड्रोनचा आकार हा मच्छरासारखा आहे. मच्छराच्या आकाराचे हे ड्रोन युद्धाच्या मैदानात विध्वंस करण्यासाठी सज्ज आहे. गुप्त लष्करी कारवायांमध्ये या मच्छर ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
या ड्रोनचा आकार लहान असला तरी याच्या आकारावर जावू नका. युद्धात मोठा विनाश घडवण्याची ताकद या मच्छर ड्रोनमध्ये असल्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी चीन या छोट्याशा ड्रोनचा वापर करणार आहे. चीनच्या राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापिठाने या ड्रोनची निर्मिती केली आहे.