‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील सलमानच्या पहिल्या मोशन पोस्टरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि आता सलमानच्या या आगामी चित्रपटात सलमानसोबत कोणती अभिनेत्री असणार त्याची इंटरनेटवर चर्चा सुरु झाली आहे. यापुर्वी चित्रपटासाठी एका अभिनेत्राचे नाव चर्चेत होते ते म्हणजे चित्रांगदा सिंगचे. काही काळापूर्वी दिग्दर्शक अपूर्व लाखियाने अखेर या चर्चेला पूर्णविराम देत चित्रांगदाची भूमिका निश्चित असल्याचे जाहीर केले.
४९ वर्षीय चित्रांगदा सिंग गेली २० वर्षे चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. मात्र, तिने आजपर्यंत कधीही सलमानसोबत स्क्रीन शेअर केलेली नव्हती. त्यामुळे ती सलमानसोबत पहिल्यांदाच झळकणार असल्याची बातमी येताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.