मुख्यमंत्री दौरेचं करत असतात, त्यांनी सरकार वाऱ्यावर सोडलय अस आरोप विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांच्या या आरोपाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस हे ई ऑफिसमधून उत्तम प्रकारे प्रशासन चालवतात. 1 तासाच्या प्रवासात मुख्यमंत्री चारदा मोबाईल बघून राज्याचा आढावा घेतात.आरोप करण्यापूर्वी महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्यांचा विकास विरोधकांनी पाहिला पाहिजे.

पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस मोदींच्या संकल्पनेला शोभणारं काम करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस 24 तास 365 दिवस राज्याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांचा मोबाईल जनतेसाठी आणि शासणासाठी उपलब्ध आहे. दावोस दौऱ्यावर असतानाही त्यांनी ई ऑफिसमधून काम केलं. तसं आता ते दिल्लीतून काम करत आहेत. कुठलाही शासन निर्णय अडत नाही. शासनाचे काम थांबत नाही.
बावनकुळेंचा सुप्रिया सुळेंना टोला
सुप्रिया ताईंनी इतर राज्याची तुलना महाराष्ट्राशी करू नये. सुप्रिया सुळेंनी नीट अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करू नये. महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्यांचा विकास त्यांनी पाहिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार उत्तम काम करतंय. उगाच बदनामी अशी विधानं करू नये असा टोला बावनकुळेंनी लगावला.