मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांची दांडी, चर्चांना उधाण!

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घटना घडत आहेत..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही ठिकाणी बैठका घेतल्या परंतु या बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर होते, असे कळते. सोबतच त्यांनी तीन महत्त्वाच्या बैठकीत अनुपस्थिती दर्शवल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आदी विकास प्राधिकरणांच्या बुधवारी घेतलेल्या बैठका घेतल्या होत्या. शिवसेनेच्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या कारणांवरून मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी ही बैठक आयोजित केली होती. परंतु शिंदे यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याआधी एक मंत्रिमंडळ बैठक तसेच 100 दिवसांच्या आढावाच्या बैठकीलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते.


पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांच्या विकास प्राधीकरणाची बैठक दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार होती तर 12.30 वाजता नगरविकास विभागांतर्गत येणाऱ्या नाशिक महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबतही बैठक होती. या बैठका नगरविकास खात्याशी संबंधित होत्या, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, एकनाथ शिंदेंच्या दांडीने नेत्यांनी पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.
शहरांशी संबंधित विकास प्राधिकरणे नगरविकास विभागाअंतर्गत येतात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री असल्याने त्यांची उपस्थिती आवश्यक होती. परंत ते गैरहजर होते. बैठकीचा निरोप एकनाथ शिंदे यांना मंगळवारी दुपारी मिळाल्याचे कळते. परंतु आपले पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकांना अनुपस्थित राहिल्याचे सांगितले जात आहे. या बैठकांना न जाता एकनाथ शिंदे हे मलंगगड उत्सवास उपस्थित राहिले होते, असे कळते. त्यातून आता शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने ठाकरे गटातील नेते नाराज झाले. त्यावरूनही नव नाराजी नाट्य रंगलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here