८-१० लोक मरायला हवेत, काँग्रेस नेत्याचे प्रक्षोभक वक्तव्य

कर्नाटकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने वक्फ विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचे समोर आलं आहे. काँग्रेस नेत्याने वक्फ दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांना रस्त्यावर उतरून बलिदान द्यायला हवं असा सल्ला दिला आहे.

कर्नाटकातील दावणगेरे येथील काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक कबीर खान यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका व्हिडीओमध्ये कबीर खान हे वक्फ विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना हिंसक आंदोलन करण्याचा सल्ला देत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक शहरात आठ ते दहा लोक मरू द्या, असं विधान कबीर खान यांनी केले आहे.

“पोस्टर पकडून, निवेदन देऊन काही फायदा होणार नाही. रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. जाळा, मरा, प्राणांचे बलिदान द्या. प्रत्येक गावातून ८-१० लोक मरायला हवेत. ५०-१०० गुन्हे दाखल व्हायला हवेत. बस, ट्रेन जाळा. या गोष्टी फक्त बोलून होत नाही. हिंदुस्तानात आज कोणीही आपले नेतृत्व नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने ते बिल रद्द होणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याग, बलिदान द्यावे लागेल,” असे कबीर खान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दोन मिनिटांची ही क्लिप अज्ञात ठिकाणी रेकॉर्ड करुन ८ एप्रिल रोजी ऑनलाइन शेअर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कबीर खानविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ समोर आल्यापासून खानचा मोबाईल फोन बंद आहे आणि त्याचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here