उल्लू या ओटीटी अॅपचा शो ‘हाउस अरेस्ट’ मोठ्या वादात अडकला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या भागानंतर अनेकांनी या शोवर आक्षेप घेतला आहे. अश्लील कंटेंट दाखवल्याचा आणि अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत महिला नेत्यांनी शो वर बंदीची मागणी केलीय आहे. काय आहे हा शो, आणि का विरोध होतोय जाणून घ्या.
रणवीर अहलाबादिया आणि समय रैना यांच्या अश्लील शेरेबाजीचा मुद्दा अजून थंड होतो ना होतो तोच आता एका अॅपमधल्या नव्या शोचा वाद समोर आला आहे. वादग्रस्त अभिनेता एजाज खान होस्ट करत असलेल्या हाऊस अरेस्ट या शो वर बंदीची मागणी होत आहे. अश्लीलतेच्या सर्व सीमा या शोमध्ये पार केल्या गेल्या असून अत्यंत आक्षेपार्ह असा कंटेट शोमधून दाखवला जातो असा आरोप केला जात आहे. रिअॅलिटी शोच्या नावाखाली सुरू असलेली अश्लीलता थांबवावी अशी मागणी महिला नेत्यांकडून केली जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत याबाबत संताप व्यक्त केला आहे. तर हा शो आणि तो दाखवणारं उल्लू अॅप या दोघांनर बंदीची मागणी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे.
दरम्यान राज्य महिला आयोगाने इजाज खान याच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो ची दखल घेतली आहे. हा शो बंद करण्याचे तसेच आवश्यक ती कारवाई करण्याचे पोलीस महासंचालकांना राज्य महिला आयोगाने आदेश दिल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.