ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने 35 वर्षांच्या वयात एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलमधील पराभवानंतर त्याने हा निर्णय घेतला. या सामन्यात स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 73 धावा केल्या, परंतु भारताने चार गडी राखून विजय मिळवला.
2 जून रोजी 36 वर्षांचा होणारा स्टीव्ह स्मिथने 19 फेब्रुवारी 2010 रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि 4 मार्च 2025 रोजी भारताविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.स्मिथच्या एकदिवसीय कारकिर्दीत 170 सामने, 5800 धावा, 12 शतके आणि 35 अर्धशतके यांचा समावेश आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी दोनदा एकदिवसीय विश्वचषक (2015 आणि 2023) जिंकणारा महत्त्वाचा खेळाडू होता. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये विश्वचषक जिंकला होता.

निवृत्तीच्या घोषणेनंतर स्मिथ म्हणाला, हा एक विलक्षण प्रवास होता आणि मी त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. खूप छान क्षण आणि उत्तम आठवणी आहेत. दोन विश्वचषक जिंकणे ही एक विलक्षण कामगिरी होती, तसेच हा प्रवास शेअर करण्यासाठी अनेक उत्तम सहकाऱ्यांसह. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करण्यासाठी लोकांसाठी आता एक उत्तम संधी आहे, त्यामुळे असे वाटते की आता खेळातून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. कसोटी क्रिकेट अजूनही प्राधान्य आहे आणि मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, हिवाळ्यात वेस्ट इंडिज आणि नंतर घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे. मला वाटते की त्या टप्प्यावर माझे योगदान देण्यासारखे अजूनही बरेच काही आहे.”