भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थिती आणि सीमेवरील प्रचंड तणावामुळे देश एक झाला आहे. या संदर्भात, भारतीय क्रिकेटपटूंनी भारतीय सैन्याच्या धाडसाचे आणि ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहे. पण अंबाती रायुडूने एक अशी कमेंट केली ज्यामुळे लोकांचा रोष वाढला. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू सोशल मीडियावर ट्रोल झाला.
आयपीएल 2025 (IPL 2025) दरम्यान, अंबाती रायुडूने एक्सवर शांततेचे आवाहन केले. त्याने महात्मा गांधींचे एक वाक्य शेअर केले. महात्मा गांधी म्हणाले होते, ‘डोळ्यासाठी डोळा घेतल्याने संपूर्ण जग आंधळे होईल.’ (“An eye for an eye makes the world blind..”) भारत-पाकिस्तान याच सुरु असलेल्या वादात अंबाती रायुडूने हे वाक्य शेअर केले आहे. यानंतर लोकांनी सोशल मीडियावर रायुडूला खूप ट्रोल केले जात आहे. भारताने जाणूनबुजून काहीही केले नाही असे म्हणत रायुडूला ट्रोल केले जातात. सगळ्यात आधी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप लोकांना मारले. त्यानंतरच हे सगळे घडत आहे, असे नेटिझन्स म्हणत आहे.