स्टार फलंदाजाने मुंबईत खरेदी केली आलिशान घरे

भारताचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला शिवम दुबे याने पत्नी सह मुंबईत दोन आलिशान घरे खरेदी केली आहेत.

ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल Squareyards.com द्वारे नोंदणी महानिरीक्षक (IGR) च्या वेबसाइटवर पुनरावलोकन केलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, शिवम दुबे आणि पत्नी अंजुम खान यांनी खरेदी केलेल्या दोन्ही फ्लॅट्सची एकूण किंमत जवळपास २७.५० कोटी रुपये आहे. शिवम दुबेने हे फ्लॅट्स देव लंड आणि हाउसिंग लिमिटेड (Dev Land and Housing Limited) कडून खरेदी केले आहेत. यात तीन पार्किंगचा देखील समावेश आहे.

शिवम दुबेच हे घर अंधेरी भागात असून हे ठिकाण वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे, लिंक रोड, एसवी रोड आणि वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाइन इत्यादींशी जोडलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here