ऑपरेशन सिंदूर दरम्यान क्रिकेटरचे आईवडिल पाकव्याप्त काश्मीरमध्ये

भारताने पाकिस्तानवर जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये खेळणाऱ्या एका स्टार क्रिकेटरचे आई वडील पाक व्याप्त काश्मीरमध्ये होते.

हा स्टार क्रिकेटर मोईन अली आहे. मोईन अली हा इंग्लंडचा क्रिकेटर असला तरी तो मूळचा पाकिस्तानचा आहे. मोईन अलीने बियर्ड बिफोर विकेट पॉडकास्टवर म्हंटले की, ‘माझे आई वडील तेव्हा पाक व्याप्त काश्मीरमध्ये होते जिथे हल्ला झाला होता. तिथून जवळपास एक तासांच्या अंतरावर बहुदा. मग ते त्याच दिवशी एकमात्र फ्लाईट पकडून निघण्यास यशस्वी झाले. मला या गोष्टीचा आनंद आहे की ते त्याचं दिवशी पाकिस्तानातून निघण्यास यशस्वी झाले. पण तो वेडेपणा होता’. जेव्हा आयपीएल एक आठवड्यासाठी थांबवण्यात आलं तेव्हा मोईन अली ने हा अनुभव शेअर केला’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here