संत तुकाराम महाराजांचे 11 वंशज शिरीष महाराज मोरे यांनी बुधवारी (दि.5) देहूतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यावरून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तर वीस दिवसांपूर्वी शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता तर 20 एप्रिलला त्यांचा विवाह होणार होता. विवाहाला दोन महिने उरले असतानाच त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय.
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी चार चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत. या चार चिठ्ठ्यांत त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे. सोबतच त्यांच्या होणाऱ्या बायकोच्या नावाने देखील एक चिठ्ठी लिहिली आहे. अन्य दोन चिठ्ठ्या त्यांनी त्यांचे आई-वडील आणि मित्रांच्या नावे लिहिल्या आहेत.

शिरीष महाराजांवर कर्जाचा डोंगर
कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवणे अन् त्यावर छपाई करुन देण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला अन् महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं. अडीच वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. नादब्रह्म ईडलीची काही लाख रुपये मोजून फ्रेंचायजी घेतली. पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरु केला, जो आज ही सुरु आहे. आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी ही महाराजांनी कर्ज घेतलं. काही महिन्यांपूर्वी एक मजली घर बनवलं, त्यासाठी ही लाखांमध्ये खर्च झाला. अलीकडेच महाराजांनी चार चाकी गाडी ही घेतली, त्यासाठी ही कर्ज घ्यावं लागलं.
मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केलं दुःख
नितेश राणे म्हणाले, संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले. मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना…ॐ शांती..भावपूर्ण श्रद्धांजली..
ही आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता आहे. या घटनेतला एक वेगळा पैलू समोर आला आहे. त्या संदर्भातला व्हिडिओ नक्की पाहा.