चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घेत असतो. चेहऱ्यावरचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे डोळे. आपले डोळे खुप बोलके असतात. पण निस्तेज, कोरडे डोळे, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे कोणालाच आवडत नाही. पण हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. सतत डोळे चोळण, ॲलर्जी, आनुवंशिकता, मानसिक ताण, झोप न येणं, कमी पाणी पिणं, वयोमान, स्क्रीनचा अधिक वापर यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. ही वर्तुळं घालविण्यासाठी मग बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरली जातात. त्यातील घटकांची योग्य ती माहिती नसल्याने ही उत्पादने अनेकदा त्वचेसाठी घातक ठरु शकतात. पण तुम्ही घरगुती उपायांनी सुद्धा ही काळी वर्तुळं घालवू शकता..
टोमॅटो
एक लहान चमचा लिंबू रस आणि लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करुन ते मिश्रण डोळ्याखाली लावावे. हे मिश्रण १० मिनीटे डोळ्यांवर ठेऊन त्यानंतर पाण्याने धुवावे. दिवसातून साधारण दोन वेळा हा प्रयोग केल्यास त्याचा फायदा होतो.

बटाटा
डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे लवकरात लवकर घालवायची असतील तर बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्यांवर लावावा. 10 मिनिटांनी डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे.
काकडी
काळे वर्तुळ कमी करण्यासाठी, काकडी वापरता येते. काकडीचा तुकडा कापून घ्या. थंड होण्यासाठी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. काकडीचे तुकडे काही वेळ डोळ्यांवर राहू द्या. यामुळे तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळेल.

दूध
दुधात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. यासाठी दूध थंड करा. दुधात कापूस बुडवून घ्या. डोळ्यांवर ठेवा. 10 ते 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर ते डोळ्यांमधून काढून टाका. त्यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होण्यास मदत होते.

गुलाब पाणी
एका भांड्यात गुलाबपाणी घ्या. त्यात कापसाचा गोळा भिजवून 20 मिनिटे डोळ्यांवर ठेवा. काही काळ तसेच राहू द्या. तुम्ही ते रोज सकाळी वापरू शकता. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होण्यास मदत होईल.