पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं आहे. व्हॅटिकनने सोमवारी व्हिडीओ निवेदन जारी करत रोमन कॅथलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकी पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागील अनेक काळापासून ते आजारी होते. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया होता, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली. ते बराच काळ रुग्णालयात होते. ते तब्बल ३८ दिवस रुग्णालयात होते आणि अलीकडेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांचं निधन त्यांच्या कासा सांता मार्टा येथील निवासस्थानी झाले.