सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात गुरुवारी मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वधारले होते. आज मात्री चांदी आणि सोनं या दोन्ही मौल्यवान धातूच्या दरांत घट झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६०० रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं ९८,७३० रुपयांवर पोहोचलं आहे.
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी उलटफेर झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव यामुळं त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरात होताना दिसत आहे. आज दोन्ही मौल्यवान धातुच्या दरात घट झाली आहे. आज चांदी १,०७.६७७ रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करताना दिसत आहे. काल चांदी १,०७.६७७ रुपयांवर चांदी स्थिरावली होती. सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या दरात ५५० रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं ९०,५०० रुपयांवर स्थिरावलं आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात ४५० रुपयांची घट झाली असून 74,050 रुपयांवर स्थिरावलं आहे.