दिल्लीत मुस्लिम मतदार ठरवणार सत्ता? एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आप, भाजप आणि काँग्रेसचं भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. 8 फेब्रुवारीच्या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर यायला सुरुवात झाली आहे. बहुतेक एक्झिट पोलनुसार भाजप सत्तेत येणार असल्याचं भाकीत करण्यात आलं आहे. तर काही एक्झिट पोल मध्ये आपला पुन्हा संधी मिळेल असं सांगितलं आहे.
मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांची भूमिका फार मोठी असते. मुस्लिम मतदार कोणाच्या पारड्यात मतांचं दान टाकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. यंदा दिल्लीतील मुस्लीम समाजाने पुन्हा एकदा आम आदमी पक्षावर विश्वास दर्शवला आहे. तर भाजपच्या पारड्यात काँग्रेसपेक्षाही अधिक मुस्लीम मते जाताना दिसत आहेत. मॅट्रिझच्या सर्वेक्षणानुसार, या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला ६७ टक्के मुस्लीम मते मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या पारड्यात ११ टक्के आणि काँग्रेसच्या पारड्यात ९ टक्के मुस्लीम मते जाण्याची शक्यता आहे. याशिवाय १३ टक्के मुस्लीम मते इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

मुस्लिम बहुल भागातील मतदान

दिल्लीत ५७.७० टक्के एवढे मतदान झाले. येथील मुस्लीम भागांचा विचार करता, चांदणी चौक येथे ५२.७६ टक्के, मतियामहल येथे ६१.४० टक्के, बल्लीमारन येथे ५९.५६ टक्के, ओखला येथे ५२.७७ टक्के, सीमापुरी येथे ६२.४७ टक्के, सीलमपूर येथे ६६.१४ टक्के, बाबरपूर येथे ५४.५१ टक्के, मुस्तफाबाद येथे ६६.६८ टक्के, करावलनगर येथे ६२.७४ टक्के तर जंगपुरा येथे ५५.२ टक्के मतदान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here