आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे भाजपचे जायंट किलर परवेश वर्मा कोण?

दिल्लीत आप चांगलीच आपटली आहे. आप सरकारचे अनेक महत्त्वाचे चेहरे पराभूत झाले आहेत. आप चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन, कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज पराभूत झाले आहेत. भाजपच्या परवेश वर्मा यांनी 3186 मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आपच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. दरम्यान दिल्लीत झालेल्या या पराभवानंतर आपच्या सर्वच कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दिल्ली निवडणुकीत खराब कामगिरीमुळे आपने कार्यालयाला आतून टाळे ठोकले आहे. आपच्या पक्ष कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे अरविंद केजरवील आणि भाजपच्या परवेश वर्मा यांच्यात लढत झाली होती. यामध्ये परवेश वर्मा यांनी 1844 मतांनी विजयी मिळवला आहे. त्यामुळे जायंट किलर म्हणून परवेश वर्मा यांच्याकडे पाहिलं जात आहे. परवेश वर्मा यांना 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारले होते, पक्षाच्या नेत्यांकडून त्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन मिळाले होते.

कोण आहेत परवेश वर्मा ?

परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवून बाजी मारली.
परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत.
48 वर्षीय परवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीचे माजी खासदार आहेत.
परवेश वर्मा 2014 आणि 2019 असे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
2019 मध्ये दिल्लीच्या इतिहासत सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे खासदार म्हणून परवेश यांनी विजय मिळवला होता. त्यांना 5 लाख 78 हजार 486 इतकं मोठं मताधिक्य मिळालं होतं.

अमित शहांनी दुसरीकडून लढण्याचा दिला होता सल्ला

परवेश वर्मा यांच्या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक भाषण व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अमित शाह म्हणत आहेत की, “परवेश वर्मा हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत. त्यांचे वडील साहिब सिंग वर्मा दिल्लीचे मुख्यमंत्री होते. प्रवेश वर्मा यांची परंपरा आहे की, जिथून ते निवडून येतात, तिथे ते कोणालाही तक्रार करण्याची संधी देत ​​नाहीत. मी प्रवेश यांना फोन करून घरी बोलवत सांगितले होते, की ते एक चांगले व्यक्ती आहेत, त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी. यावर प्रवेश वर्मा म्हणाले, नाही, मी जिंकेन. जर मी लढलो तर फक्त केजरीवाल यांच्याविरुद्धच लढेन.” परवेश वर्मा यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here