देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी तब्येतीच्या कारणाचा हवाला देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा दिला असला तरी, या निर्णयामागे राजकीय वाद असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोगाचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. त्यानंतर सरकारकडून त्यांना आलेला कॉल आला आणि त्यावेळी वाद झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.‘एक कॉल’ आणि वादसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून धनखड यांना एक फोन कॉल आला आणि त्यानंतर वादविवादाला सुरुवात झाली. या कॉलनंतर धनखड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.