देशी अंडी की पांढरी अंडी सर्वात जास्त काय फायदेशीर?

देसी (तपकिरी) की पांढरे अंडे नेमकं आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे, याबद्दल आजही अनेकांच्या मनात गोंधळ आहे. तुम्हालाही हीच समस्या असेल तर पोषण आणि दोन्हीचे फायदे याबद्दल याबद्दल जाणून घेऊया

सर्वात प्रथम अंड्याचे रंगाबद्दल जाणून घेऊयात. देशी अंडी भारतीय किंवा स्थानिक कोंबड्यांच्या जातींपासून येतात. जसे की देसी बंकर कोंबडी. ही अंडी हलक्या तपकिरी किंवा तपकिरी रंगाची देतात. दुसरीकडे, पांढरी अंडी सहसा थर जातीच्या (जसे की व्हाईट लेगहॉर्न) कोंबड्यांपासून येतात. अंड्याचा रंग केवळ कोंबडीच्या जातीवर अवलंबून असतो, पोषणावर नसतो हे विशेष जाऊन घ्या.

देशी अंड्यांमध्ये सामान्यतः थोडे जास्त पोषक घटक असून देशी कोंबड्या खुल्या वातावरणात राहतात आणि नैसर्गिक आहार (कीटक, बिया, हिरवी पाने इ.) खातात. त्यामुळे त्यांच्या अंड्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि बीटा-कॅरोटीन जास्त असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले गेले आहे. तर पांढरी अंडी सामान्यतः पोल्ट्री फार्ममध्ये वाढवलेल्या कोंबड्यांपासून मिळतात. जिथे त्यांना संतुलित आणि नियंत्रित आहार दिला जातो. ही अंडी स्वस्त आणि बाजारात सहज उपलब्ध असतात. कोंबड्यांना पौष्टिक आहार मिळाल्यास त्यांचे पोषण भारतीय अंड्यांसारखेच दिसतातय. जरी सहसा त्यांचे पोषण थोडे कमी असतं. पांढऱ्या अंड्यांचे कवच पातळ असते, ज्यामुळे ते तोडणे सोपे असतं.

देशी अंड्यांचा स्वाद थोडासा घट्ट आणि जाड असतो. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, देशी अंडी जास्त ‘तृप्त’ असतात. दुसरीकडे, पांढरी अंडी हलकी आणि सहज पचणारी असतात, म्हणून मुलं आणि वृद्धांना ती खाण्याचा सल्ला दिला जातो. महत्त्वाचं म्हणजे देशी अंडी पांढऱ्या अंड्यांपेक्षा महाग असतात कारण देशी कोंबड्या वाढवण्यासाठी जास्त वेळ आणि पैसा लागतो. पांढरी अंडी सर्वत्र सहज उपलब्ध असतात आणि बजेटला अनुकूल मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here