महादेव मुंडे हत्या तपासाची मुख्यमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती

बीडमधील महादेव मुंडे प्रकरणाचा तपास वेगाने सुरु असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून 196 जणांची विचारणा केली आहे. तसेच 83 साक्षीदारांकडे तपास केले आहे. तर 286  लोकांकडे मोबाईलद्वारे तपासणी केल्याचे फडणवीस म्हणाले. याप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  

खुल्या मैदानात हल्ला झाला, त्यामुळं साक्षीदार सापडला नाही. एक महिला दीड महिन्यांनी पुढे आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. डम डाटा आपण तपासत आहोत. महादेव मुंडे यांच्या पत्नीचा आक्रोश मी समजू शकतो. याप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जलील शेख हत्या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आव्हाड यांनी केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ते मनसेचे कार्यकर्ते होते. नजीब मुल्ला यांनी कारस्थान रचल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. यातील 9 आरोपी निश्चित झाले आहेत, यामध्ये 7 जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघे फरार आहेत. याप्रकरणी पुरावे पुन्हा पडताळणार असून, पुन्हा या प्रकरणी चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here