औरंगजेबाची कबर हटवता येणार नाही, देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!

xr:d:DAFFuQ1RO2w:174,j:30841316958,t:22071516

देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर हटवता येणार नाही असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्याला आवडो न आवडो, मात्र हे मान्य करावंच लागेल की औरंगजेबाची कबर ही भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येते. या कबरीला भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षण दिलं आहे. त्यामुळे कबर तिथून हटवता येणार नाही. मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही कदापि मान्य करणार नाही. ”

राज ठाकरे यांनी ही कबर उखडू नका उलट तिथे फलक लावा आणि मराठ्यांनी औरंगजेबाला इथे गाडला हे सगळ्यांना सांगा अशी भूमिका घेतली होती. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होऊ लागली. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here