महायुती सरकारने स्वत:चाच विक्रम मोडला, जाणून घ्या नेमका कसा?

xr:d:DAFFuQ1RO2w:174,j:30841316958,t:22071516

नहायुती सरकारने त्यांचाच विक्रम मोडला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिली आहे. गेल्या १० वर्षांतील विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांत महाराष्ट्रात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट ही माहिती दिली. या पोस्टमध्ये विविध राज्यांत आलेल्या विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी मांडली असून विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशातील नंबर एकचे राज्य ठरल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की गेल्या १० वर्षांमधील कुठल्याही एका वर्षांत आलेल्या विदेशी गुंतवणुकीपेक्षा अधिक गुंतवणूक यंदा केवळ नऊ महिन्यांत प्राप्त झाली आहे. या वर्षाची एक तिमाही बाकी असून या आर्थिक वर्षांत राज्यात विक्रमी विदेशी गुंतवणुकीची नोंद होईल. दरम्यान, फडणवीस यांनी सांगितलं की विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने आपलाच जुना म्हणजेच २०१६-१७चा विक्रम मोडला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने विदेशी गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यांत महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षांतील पहिल्या नऊ महिन्यांत आतापर्यंत एकूण १,३९,४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here