राज ठाकरेंसोबत एकत्र लढणार का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

xr:d:DAFFuQ1RO2w:174,j:30841316958,t:22071516

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाष्य केलं. या निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार की एकत्र? या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.

“महापालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढेल. आम्ही तिघं एकत्र राहू. एखाद्या महापालिकेत कदाचित नाही होऊ शकणार. पण जिथे जिथे शक्य होईल त्या त्या ठिकाणी एकत्र लढण्याचाच आमचा निर्णय असेल. मुंबईत आम्ही एकत्रच लढणार हे निश्चित आहे”, असं फडणवीस ठामपणे म्हणाले.

दरम्यान, सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन प्रमुख पक्ष आहेत. या तिघांमध्ये चौथा पक्ष म्हणून राज ठाकरेंचा मनसे सहभागी होऊ शकतो अशा चर्चेला सध्या उधाण आलं आहे. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नसल्याचे सूतोवाच देवेंद्र फडवीसांनी यावेळी केले.

“राज ठाकरेंच्या बाबतीत आजतरी आमचा काही निर्णय झालेला नाही. आणि त्यांचा निर्णय ते घेतात, दुसरं कुणी घेत नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय ते काय घेतात, तेव्हाची परिस्थिती काय असते, आमची परिस्थिती काय असते यावर सगळं अवलंबून असेल. हे खरंच आहे की आम्ही तिघंच सामावून घेता घेता खुर्ची कमी पडायला लागली आहे. त्यामुळे आमच्यात चौथा सामावून घेता येईल का? असाही प्रश्न आहे. या सगळ्या मुद्द्यांचा त्या त्या वेळी विचार करू”, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here