राजीनाम्यानंतरही धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांसह राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी संपतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आणखी एका प्रकरणामुळे त्यांच्या भोवतीचा फास आवळताना दिसत आहे.
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. करुणा शर्मा यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे.
करुणा शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2024 च्या परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी त्यांच्याबाबत माहिती दिली होती. त्यात पत्नी राजश्री मुंडे, तीन मुले आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. पण करुणा शर्मा यांच्या नावावर असलेल्या संपत्तीचा कोणताही उल्लेख त्यांनी त्या शपथपत्रात केला नव्हता. त्यामुळे धनंजय मुंडेंनी संपत्तीची माहिती लपवली असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी आज परळी न्यायालयात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here