तंत्रज्ञान जस जस प्रगत झालं तस सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे नवनवीन प्रकार शोधले जाऊ लागले. हल्ली डिजिटल अरेस्टचे प्रकार वारंवार कानावर येत आहेत. या माध्यमातून अनेकांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल स्वरुपात अटक. या प्रकारात एखादी व्यक्ती पोलीस असल्याचं सांगून किंवा ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हीडिओ कॉल करतो. ड्रग्स कींव मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात तुम्ही अडकले आहात असं सांगून तुम्हाला घाबरवतो. यातून सुटण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. आपण घाबरून पैसे देतो आणि नंतर आपली फसवणूक झाल्याचं आपल्या लक्षात येतं.
डिजिटल अरेस्टपासून वाचायचं असेल किंवा असा व्हिडिओ कॉल आला तर काय करायचं याविषयी सायबर तज्ञ ओंकार गंधे यांचा विशेष पॉडकास्ट नक्की पहा