सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी तिच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी आता मोठा दावा केला आहे.
आदित्य ठाकरे, डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते. अशा काही सिक्रेट बाबी समोर आल्या आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरे यांना तात्काळ अटक होऊ शकते, अटक झाली पाहिजे असे वकील ओझा म्हणाले. ते पुढे म्हणाले, आरोपींचा असा दबदबा चालणार नाही. निष्पक्ष कारवाई होऊ शकते, त्या ठिकाणी ही केस ट्रान्सफर करावी. ही आमची मागणी आहे. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात सामूहिक बलात्कार, हत्या अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. कस्टडी घेण्यात यावी. यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावे ही आमची प्रमुख मागणी आहे, असे ओझा म्हणाले.
दरम्यान, याचिकाकर्ते, वकील, साक्षीदार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. समीर वानखेडे यांच्याकडे महत्त्वाचा डेटा आहे. त्यांच्या पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. NCB काही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. ते सर्व मेन्शन केले आहे. त्या डेटामध्ये आहे, असे ते म्हणाले.