दिव्या देशमुख हिने अंतिम सामन्यात ग्रँडमास्टर आणि भारतीय खेळाडू कोनेरू हम्पीला हरवून महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. या विजयासह तिने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला असा बहुमानही पटकावला आहे. दोन्ही शास्त्रीय सामने अनिर्णित राहिल्यानंतर रॅपिड टायब्रेकरमध्ये निर्णय घेण्यात आला ज्यात दिव्या देशमुखने हम्पीला 1.5-0.5 असा पराभव करुन तिने विजय मिळवला.
तर या शानदार विजयासह, दिव्या देशमुख ही भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली आहे.