सांगलीतील तरुण कंत्राटदारदाराला सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर धारेवर धरलं आहे. संजय राऊत यांनी थेट सरकारवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर संजय राऊत यांनी एक पोस्ट केली. त्यात म्हणाले की, सरकार अमानुष निर्दय आहे. स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत. हर्षल पाटीलची आत्महत्या ही मराठी तरुणांची अगतिकता आहे. सरकारने केलेला हा सदोष मनुष्य वध आहे. हायकोर्टाने स्यू मोटो दखल घेऊन खालील तिघांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा.’ या पोस्टसोबत एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. यावर फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचा फोटो असून हर्षल पाटील ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्याच आहे, असं अखोरेखित केलं आहे.