20 जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी निर्णयांचा धडाका लावला. त्यांच्या अनेक निर्णयांनी अनेक देशांना आश्चर्यचकित केलं. आता अमेरिकेच्या प्रशासनाने रशियावर कठोर निर्बंध लागू केले, यामध्ये रशियन तेलाच्या निर्यातीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामुळे भारतालाही फटका बसण्याची शक्यता आहे.
रशिया आणि भारताच्या वाढत्या जवळीकतेवर देखील ट्रम्प त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रशियन तेलाच्या निर्यातीवर लादलेल्या बंधनांचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कारण सध्या भारत मोठ्या प्रमाणावर रशियन कच्च्या तेलावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, हे निर्बंध केवळ ट्रम्प प्रशासनानेच नव्हे, तर जो बायडेन प्रशासनानेही लागू केले आहेत.
भारत आणि रशियाच्या दृढ मैत्रीचे प्रतीक म्हणून रशियाने भारताला आधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट, INS तुशील भेट केले आहे. यामुळे, सध्याच्या रशिया-अमेरिका संबंधांच्या तणावपूर्ण परिस्थितीत, रशियन तेलाच्या खरेदीबाबत भारताने कोणता निर्णय घ्यावा, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.