दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम चौथ्यांदा वडील बनले आहेत. बुधवारी शेख हमदान यांच्या पत्नी शेखा शेख यांनी बाळाला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या चिमुकल्या मुलीचं नाव हिंद ठेवलं आहे. हे नाव शेख हमदानची आई हिंद बिंत मकतूम बिन जुमा यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं आहे. शेख हमदान यांनी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती दिली. आपल्या मुलीच्या स्वास्थ्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्याने आशीर्वाद मागितले. त्यांच्या या पोस्टवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
शेख हमदान आणि शेखा शेख यांना आधी तीन मुलं आहेत. २०२१ मध्ये त्यांना जुळी मुलं झाली. शेखा आणि रशिद अशी त्यांची नावे ठेवली. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव मोहम्मद बिन. आता चौथ्यांदा त्यांना मुलगी झाली असून तिचं नाव हिंद ठेवण्यात आलं आहे. कुटुंबात तिचं अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलं.