युरिन इन्फेक्शन खूप त्रासदायक, जाणून घ्या त्याबद्दल अधिक!

मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) ही एक सामान्य समस्या आहे. जी बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होते. पण जर योग्य वेळी त्याची काळजी घेतली नाही तर ही समस्या गंभीर होऊ शकते. जर तुम्हाला Urine Infectionची लक्षणे आढळली तर योग्य उपाययोजना करणे महत्वाचे आहे. या लेखात, आपण लघवीच्या संसर्गादरम्यान काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेणार आहोत.

बॅक्टेरिया: सर्वात सामान्य कारण म्हणजे बॅक्टेरिया.

स्वच्छतेचा अभाव: विशेषतः महिलांमध्ये, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव हे मूत्र संसर्गाचे एक प्रमुख कारण असू शकते.

कमी पाणी पिणे: पाण्याअभावी मूत्रमार्गात बॅक्टेरिया वाढू शकतात.

मूत्र संसर्ग टाळण्यासाठी काय करावे

जास्त पाणी प्या: लघवीच्या संसर्गादरम्यान पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, कारण ते मूत्रमार्गातील बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत करते. दिवसातून कमीत कमी ८-१० ग्लास पाणी प्या.

अँटीबायोटिक्स घ्या: तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेले अँटीबायोटिक्स योग्य वेळी आणि पूर्ण कालावधीसाठी घ्या. हे संसर्ग बरा करण्यास मदत करतात.

स्वच्छतेची काळजी घ्या: लघवीचा संसर्ग टाळण्यासाठी, विशेषतः लघवी केल्यानंतर स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

हीट पॅड वापरा: ओटीपोटात किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना किंवा जळजळ कमी करण्यासाठी हलका हीट पॅड किंवा गरम पाण्याची बाटली वापरा.

स्वच्छ आणि आरामदायी कपडे घाला: त्वचेला आराम देण्यासाठी सैल आणि सुती कपडे घाला आणि घाम शोषून घेणारे कपडे घाला, जेणेकरून बॅक्टेरिया वाढणार नाहीत.

फायबर आणि पाण्याने समृद्ध आहार घ्या: शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि मूत्रमार्ग निरोगी ठेवण्यासाठी फळे, भाज्या आणि फायबरयुक्त आहार घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here